Tag: अखंड हरिनाम सप्ताह

श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सवाला भक्तिमय प्रारंभ

श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सवाला भक्तिमय प्रारंभ

धर्म अध्यात्म
नवीन नांदेड, प्रतिनिधी | बसवेश्वर नगर, जुना कौठा परिसर येथील श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिर देवस्थानात दि. २४ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत १६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर संस्थान व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आठ दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भारावून जाणार आहे. सप्ताहादरम्यान पहाटे काकडा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीराम कथा, हरिपाठ तसेच दररोज रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक कार्यक्रमानुसार पहाटे ५ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ...
error: Content is protected !!