नांदेड परिक्षेत्रात मोठी मोहीम; गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांवर पोलिसांचा कडक प्रहार
नांदेड परिक्षेत्रात धडक मोहीम; आठवड्यात ७३ गुन्हे, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पहिल्याच आठवड्यात मोठे यश मिळाले आहे. दि. ११ ते १७ एप्रिल दरम्यान झालेल्या कारवाईत एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ₹५०.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. यामध्ये गुटखा प्रकरणे: १२ गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे: १ गुन्हा, शस्त्र अधिनियमांतर्गत: ६० गुन्हे दाखल झाले असून, ₹30,60,611 किमतीचा गुटखा व अन्य साहित्य ₹1,12,550 किमतीचा गांजा ₹18,79,230 किमतीची शस्त्रे (३ गावठी पिस्टल, १० काडतुसे, तलवारी, खंजीर) अशी एकू...
