Tag: नांदेड

नांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड

नांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना धावणारी वाहने, फटाका बुलेट, ट्रिपल सीट, मोबाईल वापरत वाहन चालविणारे तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फळगाड्यांवर कारवाई करत एकूण २४१ केसेस नोंदवण्यात आल्या. ही कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज गुरव आणि शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह ही मोहीम राबवली. रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या प्रमुख भागात वाहनांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. तसेच ऑटो- चालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून त...
चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| अवैध चंदन तस्करीविरोधात नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लातूरहून मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरकडे आयशर वाहनातून चंदनाची तस्करी होणार होती. त्यानुसार, लोहा-नांदेड मार्गावरील सई हॉटेलजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे दिसून आले, मात्र तपासात ड्रायव्हरच्या मागील बाजूस बनवलेल्या गुप्त कप्प्यात चंदन लपवून ठेवले असल्याचे उघड झाले. या कप्प्यातून 1,470 किलो वजनाचे सुमारे 36.75 लाख रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले. तसेच आयशर वाहन आणि 11 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 51.96 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी तुकाराम बुंदराळे, तौफिक देशमुख, रामदास बुंदराळे, बाळासाहेब जाधव आणि शंकर मानपा...
हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन पेटले; ‘गाव बंद’ची घोषणा

हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन पेटले; ‘गाव बंद’ची घोषणा

सामाजिक
हिमायतनगर| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने आता आंदोलनाचे रूप अधिकच तीव्र झाले आहे. नगरपंचायत समोरील आमरण उपोषण पाचव्या दिवशी सुरूच असून, रविवारी बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आल्याने वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपोषणकर्ते माधव शिंदे यांच्या आंदोलनाला आता प्रहार जनशक्ती संघटनेचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. संघटनेचे विधानसभा अध्यक्ष दत्ता देशमुख यांनी आंदोलनात थेट सहभाग घेत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निर्णयात विलंब होत असल्याने दिनांक 05 एप्रिल रोज रविवारी संपूर्ण हिमायतनगर ‘बंद’ ठेवण्याची हाक देण्यात आली असून, याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही जागांपैकी एकही जागा उपलब्ध करून देता येत नसल्याचे स्पष्ट केल...
सोनारी फाटा येथे पुन्हा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

सोनारी फाटा येथे पुन्हा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

क्राइम
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर येथील वार्डक्रमांक 3 मधील रहिवाशी युवक सदाम आपल्या वाहनाने जात असताना सोनारी फाट्यावर अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. सोनारी फाटा हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असून, येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. विशेषतः स्पीड ब्रेकर नसल्यामुळे किंवा योग्य संकेत चिन्हांच्या अभावामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सोनारी फाटा चौरस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची आणि आवश्यक स...
पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

क्राइम, महाराष्ट्र
नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहि...
बॅग लिफ्टिंग टोळीचा पर्दाफाश; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपी ताब्यात

बॅग लिफ्टिंग टोळीचा पर्दाफाश; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपी ताब्यात

क्राइम
नांदेड| शहरात वाढत्या बॅग लिफ्टिंग घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेत सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून २ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भ्रतरीनाथ उर्फ भरत रवींद्र पवार (वय २५), नागेश छत्रपती वाहूळकर (वय १९) यांच्यासह इतर आरोपींचा समावेश असून काही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे...
20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

आरोग्य
नांदेड (गोविंद मुंडकर) दि. 20 मार्च ते 20 एप्रिल 2026 हा कालावधी ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’ म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे.नागरिकांमध्ये दंत व मौखिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, नागरिक आणि विशेषतः वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, बालगृहे आणि ग्रामीण भागात मोफत तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि आरोग्य मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 02 एप्रिल 2026 रोजी नांदेड येथील सुमन बालगृहात मौखिक आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नि. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम बुट्टे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राष्ट्रपाल औसारे तसेच दं...
नंदगिरी किल्ल्यावर शुक्रवारपासून शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र,आयुधे यांचे प्रदर्शन

नंदगिरी किल्ल्यावर शुक्रवारपासून शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र,आयुधे यांचे प्रदर्शन

महाराष्ट्र
नांदेड| येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे उद्या, शुक्रवार, दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या शिवकालीन सुवर्ण होन, दोन हजार वर्षांपासूनची प्राचीन नाणी व पुरातन शस्त्रे व आयुधे यांचे आगळे वेगळे अभिनव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले नांदेडच्या नंदगिरी किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या सुवर्ण होन (सुवर्ण नाणे) प्रदर्शनाचे उद्घाटन दि.३ एपिल रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले व प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, इंटेकचे चेअरमन अशोकसिंघ ठाकूर यांची उपस्थ...
मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

सामाजिक
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने ता. १ एप्रिल रोज बुधवारी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्याचे दुःख अनावर झाल्याने थकलेला बाप काशीम लालासाब निछलकर वय ७० वर्ष हे मुलाच्या मृत्यूच्या विरहात अवघ्या चार तासांतच म्हणजेच ठीक ६ वाजता गतप्राण झाले असल्याने फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे. फुलवळ येथील हुसेन निछलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालखीची असताना देखील मोठ्या धैर्याने ते संकटाशी सामना करत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण हे रात्रंदिवस काबाड कष्ट करीत करत होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारावर बरेच दिवस झाले उपचार चालूच होता. असे असताना देखील त्यांनी हिम्मत न हरता परिस्थितीला सामोरे गेले पण आज अचानक वडील व मुलाचा मृत्यू झाल्यामुळे निछलकर कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले. या कुटुंबियांना राज...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाई : नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांच...
error: Content is protected !!