महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे – अनिल वाघमारे

मुंबई| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे पार पडणार असून, या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणारे हे राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी 18 व 19 एप्रिल 2026 रोजी उदगीर येथे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांच्या हस्ते होणार आहे.

या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असून, खासदार संजय राऊत यांची थेट मुलाखत देखील आयोजित करण्यात आली आहे. तसेच विविध मान्यवर मंत्री, खासदार, आमदार आणि सेलिब्रिटींची उपस्थिती अधिवेशनाला लाभणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे बांधकाम राज्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हेही उपस्थित राहणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना आवाहन केले आहे की, आपल्या-आपल्या जिल्ह्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सदस्यांना या अधिवेशनाची माहिती देऊन मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तयारी करावी. या पार्श्वभूमीवर 18 व 19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणाऱ्या या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकार, डिजिटल मिडिया प्रतिनिधी आणि संबंधित घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!