करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

संगीतविश्वाला मोठा धक्का: आशा भोसले यांचे निधन

संगीतविश्वाला मोठा धक्का: आशा भोसले यांचे निधन

करियर
मुंबई | भारतीय संगीतविश्वातील महान पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल 2026) मुंबईत निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्याधिक थकवा, छातीत इन्फेक्शन तसेच हृदय व श्वसनासंबंधी गुंतागुंतींमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा आनंद भोसले यांनी दिली असून, उद्या सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी शिवाजी पार्क येथे होणार आहेत. आठ दशकांची सुवर्ण कारकीर्द आशा भोसले यांनी 1940च्या दशकात आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली आणि हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांचा आवाज, बहुविध शैली आणि अद्वितीय गायकीमुळे त्या भारतीय संगीताचा अविभाज्य भाग बनल्या. संगीतविश्वात शोककळा त्यांच्या निधनाने भारत...
मंगरूळ ग्रामपंचायतीत निधी वापराबाबत प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचा चौकशीचा आग्रह

मंगरूळ ग्रामपंचायतीत निधी वापराबाबत प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचा चौकशीचा आग्रह

करियर
वित्त आयोगाच्या निधीतील अनियमिततेचा आरोप, अन्यथा 20 एप्रिल पासून आंदोलन करण्याचा इशारा हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर शंका व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. निधीच्या खर्चात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वित्त आयोगाच्या निधीतील अनियमिततेची सखोल चौकशी करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गंगाधर पांडलवाड यांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाच्या म्हणण्यानुसार, मंगरूळ ग्रामपंचायतीकडून विविध विकासकामांसाठी खर्च झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी खर्चाच्या तुलनेत कामांची गुणवत्ता अत्यंत कमी असल्याचा आरोप करण्यात येत ...
‘नांएसो’ अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांचा प्राध्यापकांकडून सत्कार

‘नांएसो’ अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांचा प्राध्यापकांकडून सत्कार

करियर
नांदेड| हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सीए डॉ. प्रवीण पाटील यांचा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त प्राध्यापकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पीपल्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ. पाटील यांना शाल, श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भेट देऊन गौरविण्यात आले. खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वीच डॉ. प्रवीण पाटील यांच्याकडे होती. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या इतिहासात संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ यांनी १९५० ते १९७२ या काळात अध्यक्षपद भूषविले, त्यानंतर पद्मविभूषण गोविंदभ...
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पीपल्स कॉलेजमध्ये सत्कार

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पीपल्स कॉलेजमध्ये सत्कार

करियर, स्थानिक
नांदेड| हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी People's College Nanded येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळाची निवड नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. प्रफुल अग्रवाल, सचिवपदी प्रा. सौ. शामल पत्की तसेच सहसचिवपदी अॅड. प्रदीप नागपूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात पीपल्स महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रफुल अग्रवाल आणि सहसचिव अॅड. प्रदीप नागपूरकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला...
मुलींकडून शुल्क वसुली प्रकरण; शासनाच्या घोषणेनंतरही महाविद्यालयांचा मनमानी कारभार उघड

मुलींकडून शुल्क वसुली प्रकरण; शासनाच्या घोषणेनंतरही महाविद्यालयांचा मनमानी कारभार उघड

करियर
नांदेड (प्रतिनिधी) राज्य शासनाने मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला असूनही नांदेड जिल्ह्यातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थिनींकडून शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट इशारा देत अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय अमलात आणला. या अंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची भरपाई शासनाकडून महाविद्यालयांना दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थिनींकडून शुल्क आकारणी सुरूच ठेवली असल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, काही महाविद्यालयांनी “शासनाकडून पैसे आल्यानंतर विद्यार्थिनींना परत करू” असे सांगून सलग दोन वर्षे रक्कम वसूल केली. परंतु शासनाची रक्कम मिळूनही संबंधित ...
सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

करियर
नांदेड (प्रतिनिधी)  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कुलगुरूंनी सांगितले की, फुले-आंबेडकरांचे विचार केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. “हे विचार समाजातील बांधिलकीची जाणीव करून देतात आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. मात्र त्यांचा प्रभाव दिसण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या दृष्टिकोनात बदल घडवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, प्रमुख वक्ते डॉ. नारायण कांबळे, डॉ. रवी सरोदे, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. राजेंद्र गोणारकर तसेच...
गुजराती हायस्कूलसाठी अभिमानाचा क्षण – डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रौप्य पदक

गुजराती हायस्कूलसाठी अभिमानाचा क्षण – डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रौप्य पदक

करियर, स्थानिक
नांदेड (प्रतिनिधी) वजीराबाद येथील गुजराती हायस्कूलसाठी अत्यंत आनंदाची आणि गौरवास्पद बातमी समोर आली आहे. शाळेचा विद्यार्थी अविश आनंदराव वाघमारे याने प्रतिष्ठित डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत रौप्य पदक पटकावले आहे. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि परंपरेला नवे अधोरेखन मिळाले आहे. डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा ही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या निरीक्षणशक्ती, विश्लेषणक्षमता आणि प्रयोगशीलतेचा विकास करण्यासाठी आयोजित केली जाणारी एक प्रतिष्ठित राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या परीक्षेत दरवर्षी राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभाग घेतात. अशा कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षेत रौप्य पदक मिळवणे हे मोठे यश मानले जाते. अविश वाघमारे याने आपल्या जिद्दीच्या, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या आणि विज्ञानावरील प्रामाणिक आवडीच्या जोराव...
नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालयाची दयनीय अवस्था; मद्यप्राशन करणाऱ्यांच्या विळख्यात परिसर

नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालयाची दयनीय अवस्था; मद्यप्राशन करणाऱ्यांच्या विळख्यात परिसर

करियर
नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय हे भावी शिक्षक घडविणारे महत्त्वाचे केंद्र असले तरी सध्या या महाविद्यालयाच्या परिसराची दयनीय अवस्था समोर येत आहे. विशेषतः महाविद्यालयाच्या इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीजवळील मोकळी व आडोशाची जागा मद्यप्राशन करणाऱ्या टोळ्यांसाठी अड्डा बनल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. सन 2007 पासून नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या इमारतीत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, महाविद्यालयाच्या परिसरातील परिस्थिती चिंताजनक आहे. इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीखालील जागा ही मोकळी व आडोशा...
हिमायतनगरचा ऋतुराज सुवर्णकार MPSC मध्ये यशस्वी; पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती

हिमायतनगरचा ऋतुराज सुवर्णकार MPSC मध्ये यशस्वी; पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती

करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी सुनील वेदप्रकाश सुवर्णकार यांचे चिरंजीव ऋतुराज सुनील सुवर्णकार यांनी लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन करत संभाजीनगर पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती मिळवली आहे. मेहनतीचे फळ साध्या नोकरीत कार्यरत असलेल्या वडिलांनी मुलाला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवले. त्यानंतर ऋतुराज यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून खासगी नोकरी न करता MPSC ची तयारी करत शासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्णही केला. कुटुंबाचा मोठा वाटा ऋतुराज यांच्या यशामागे आजोबा वेदप्रकाश सुवर्णकार व आजी कमल सुवर्णकार यांचे मोठे योगदान असून, त्यांनी त्यांच्यासोबत राहून शिक्षणात मोलाची साथ दिली. खेळाडू कोट्यातून निवड शाफ्ट टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळावील असून, त्...
हिमायतनगरचा अभिमान! डॉ. ओंकार देवसरकर ‘MBBS’ पदवीधर; ग्रामीण युवकांसाठी प्रेरणेचा दीप

हिमायतनगरचा अभिमान! डॉ. ओंकार देवसरकर ‘MBBS’ पदवीधर; ग्रामीण युवकांसाठी प्रेरणेचा दीप

करियर
हिमायतनगर/सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) जिद्द, कष्ट आणि स्वप्नांच्या जोरावर ग्रामीण भागातूनही मोठी भरारी घेता येते, याचा प्रत्यय हिमायतनगरच्या डॉ. ओंकार देवसरकर यांनी पुन्हा एकदा दिला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी ‘MBBS’ पदवी मिळवत आपल्या गावाचा मान उंचावला. या ऐतिहासिक सोहळ्याला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने डॉ. ओंकार यांचा सन्मान होताच हिमायतनगरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा अभिमान द्विगुणित झाला. आमदारांकडून गौरव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी डॉ. ओंकार यांच्या यशाचे कौतुक करत, “ग्रामीण युवकाने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश इतरांसाठी दिशादर्शक आहे. ते पुढे उत्कृष्ट डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करतील,” असा विश्वास व्यक्त केला. घरात ‘डॉक्टर’चा डबल...
error: Content is protected !!