सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन उदासीन ; ८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन उदासीन ; ८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

सामाजिक
नांदेड| जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन (नोंदणी प्रक्रिया सुरू), दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, तसेच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मानधन तात्काळ जमा करावे, आमदार व खासदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा, DPDC अंतर्गत १% निधीचा वापर करावा, जिल्हाधिकारी बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी, दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकाऱ...
रेल मददमुळे प्रवासी तक्रारींमध्ये मोठी घट; नांदेड विभागाची उल्लेखनीय कामगिरी

रेल मददमुळे प्रवासी तक्रारींमध्ये मोठी घट; नांदेड विभागाची उल्लेखनीय कामगिरी

सामाजिक
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी सेवांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून, आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये रेल मदद (Rail Madad) या तक्रार निवारण मंचाद्वारे नोंदविल्या जाणाऱ्या प्रवासी तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. विभागातील विविध शाखांनी समन्वय साधत तक्रारींवर जलद प्रतिसाद देणे, त्यांचे प्रभावी निवारण करणे आणि सतत देखरेख ठेवणे या उपाययोजनांमुळे गाड्या व स्थानकांवरील प्रवासी अनुभवात सकारात्मक बदल दिसून आला आहे. परिणामी, प्रवाशांचा रेल्वे सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, नांदेड विभागातील महत्त्वाची गाडी असलेल्या सचखंड एक्सप्रेसबाबतच्या प्रवासी तक्रारींमध्ये तब्बल ४६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. याशिवाय, विभागाअंतर्गत धावणाऱ्या सर्व गाड्यांबाबत एकूण २६ टक्के तक्रारी कमी झाल्या आहेत, ही बाब विभागाच्या कार्यक्षमतेचे द्योतक मानली जात आ...
दुष्काळी फाट्यावर रस्ता खचला; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी

दुष्काळी फाट्यावर रस्ता खचला; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी

सामाजिक
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सिरंजनी–हिमायतनगर या महत्त्वाच्या मार्गावरील दुष्काळी फाटा येथे सीडी वर्कमधील सिमेंट पाईपला मोठे छिद्र पडल्याने रस्ता खचून पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, एसटी बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या परीक्षा सुरू असताना वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचणे कठीण झाले असून काहींना परीक्षा चुकवावी लागत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वेळा रस्ता सुरू केला होता. मात्र सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतकरी कामात व्यस्त असल्याने यावेळी स्थानिक पातळीवर दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्रामपंच...
हिमायतनगरात वाढते अपघात; स्पीड ब्रेकरसाठी काँग्रेसचा इशारा – “नाही तर रास्ता रोको”

हिमायतनगरात वाढते अपघात; स्पीड ब्रेकरसाठी काँग्रेसचा इशारा – “नाही तर रास्ता रोको”

सामाजिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून काही जण कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी ठाम मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी ALMbharat च्या माध्यमातून केली आहे. हिमायतनगर शहरातीळ विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाणारा कॉर्नर, श्री परमेश्वर मंदिर कमान रस्ता, शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) परिसर, उमर चौक कमान तसेच बोरगडी रस्ता या शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि अपघातप्रवण ठिकाणी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही प्रशासनाने दुर्ल...
असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी)मनपा हद्दीतील असरजन नाका ते वाघाळा दरम्यानचा रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामामुळे पूर्णतः नादुरुस्त झाला असून गेल्या वर्षभरापासून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्ता, चिखल आणि अडकणारी वाहने यामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक २० मधील त्रिमूर्ती नगर, विठ्ठल नगर, साईबाबा नगर आणि श्रीराम नगर या भागात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी, डॉक्टर तसेच सैन्यदलातील जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ड्रेनेज काम अपूर्ण; रस्ता अधांतरी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आला; मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी कनेक्शनही देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे ...
हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन पेटले; ‘गाव बंद’ची घोषणा

हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन पेटले; ‘गाव बंद’ची घोषणा

सामाजिक
हिमायतनगर| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने आता आंदोलनाचे रूप अधिकच तीव्र झाले आहे. नगरपंचायत समोरील आमरण उपोषण पाचव्या दिवशी सुरूच असून, रविवारी बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आल्याने वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपोषणकर्ते माधव शिंदे यांच्या आंदोलनाला आता प्रहार जनशक्ती संघटनेचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. संघटनेचे विधानसभा अध्यक्ष दत्ता देशमुख यांनी आंदोलनात थेट सहभाग घेत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निर्णयात विलंब होत असल्याने दिनांक 05 एप्रिल रोज रविवारी संपूर्ण हिमायतनगर ‘बंद’ ठेवण्याची हाक देण्यात आली असून, याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही जागांपैकी एकही जागा उपलब्ध करून देता येत नसल्याचे स्पष्ट केल...
एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर

एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर

सामाजिक
नांदेड| येथील एन.ई.एस. सायन्स कॉलेजच्या भूशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “सामाजिक कार्यासाठी पाणी” (Water for Social Cause) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे तांत्रिक व रचनात्मक नियोजन भूशास्त्र विभागाचे अधिव्याख्याते प्रा. आकाश करंडे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. गायकवाड व प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी उपक्रमाला मार्गदर्शन व नेतृत्व दिले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सदस्य कॉ. प्रदीप नागापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. एकनाथ खिल्लारे...
श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

मनोरंजन, सामाजिक
देगलूर | देगलूर शहरातील एकमेव सार्वजनिक उद्यान असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान च्या सुशोभीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांची भेट घेऊन त्यांनी उद्यानाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच कुटुंबीयांना फिरण्यासाठी शहरात पर्यायी जागा नसल्यामुळे या उद्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे नव्याने टेंडर काढून मुलांसाठी खेळण्यांची आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत हा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घेण्याचे आश्वासन दिले असून संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शहरातील मुलांमध्येही या उ...
बिलोलीत पाणपोईसाठी जागेचा प्रश्न चिघळला

बिलोलीत पाणपोईसाठी जागेचा प्रश्न चिघळला

सामाजिक
बिलोली,गोविंद मुंडकर| शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत गरजेवरच प्रशासकीय हलगर्जीपणाचे सावट आले असून, पाणपोईसाठी जागा उपलब्ध करून देण्यात बिलोली नगर परिषद अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, दुसरीकडे पाणपोईसारख्या अत्यावश्यक उपक्रमासाठी जागा न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून बिलोली शहर विकास कृती समिती आणि माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार यांच्या पुढाकारातून सुरू असलेला पाणपोईचा उपक्रम हा केवळ परंपरा नसून, तो हजारो नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेला आहे. उन्हाळ्याच्या कडक पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. मात्र, याच उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाची होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषद परिक्षेत्रातील महसूल ...
मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

सामाजिक
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने ता. १ एप्रिल रोज बुधवारी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्याचे दुःख अनावर झाल्याने थकलेला बाप काशीम लालासाब निछलकर वय ७० वर्ष हे मुलाच्या मृत्यूच्या विरहात अवघ्या चार तासांतच म्हणजेच ठीक ६ वाजता गतप्राण झाले असल्याने फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे. फुलवळ येथील हुसेन निछलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालखीची असताना देखील मोठ्या धैर्याने ते संकटाशी सामना करत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण हे रात्रंदिवस काबाड कष्ट करीत करत होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारावर बरेच दिवस झाले उपचार चालूच होता. असे असताना देखील त्यांनी हिम्मत न हरता परिस्थितीला सामोरे गेले पण आज अचानक वडील व मुलाचा मृत्यू झाल्यामुळे निछलकर कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले. या कुटुंबियांना राज...
error: Content is protected !!