क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडमध्ये कुंटनखाण्यावर पोलिसांची धाड; ६ महिलांची सुटका, २ आरोपी अटकेत

नांदेडमध्ये कुंटनखाण्यावर पोलिसांची धाड; ६ महिलांची सुटका, २ आरोपी अटकेत

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) अनैतिक मानवी व्यापारावर आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंटनखाण्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली श्याम सुदाम पानेगावकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नर्सी ते शंकर रोडवरील राजवार बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला असता, बारच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून संतोष श्रीपत पवळे (वय ३०) व शिवराज श्रीपत पवळे (वय ३...
सोनू कल्याणकर हत्येनंतर संताप; आरोपींना कठोर शिक्षेची जोरदार मागणी

सोनू कल्याणकर हत्येनंतर संताप; आरोपींना कठोर शिक्षेची जोरदार मागणी

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरात घडलेल्या सोनू कल्याणकर यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट उसळली असून सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजलीसोबतच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. श्रीनगर परिसरात पहाटे झालेल्या या हल्ल्यात सोनू कल्याणकर यांचा मृत्यू झाल्यानंतर विविध समाज घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः लिंगायत समाजाकडून मोठ्या प्रमाणात भावनिक श्रद्धांजली पोस्ट शेअर केल्या जात असून “ही केवळ श्रद्धांजली नसून न्यायासाठीचा आवाज आहे” असा संदेश दिला जात आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेविरोधात एकजूट दाखवण्यासाठी नागरिकांना पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोनू कल्याणकर हे शिवा नरंगले यांचे भाचे असल्याने या प्रकरणाला सामाजिक व राजकीय स्तरावरही...
“सेव आवर सिस्टर” चळवळीला नवे बळ

“सेव आवर सिस्टर” चळवळीला नवे बळ

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) जगभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तीन प्रमुख अवैध व्यापारांपैकी मानवी तस्करी हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलींच्या खरेदी-विक्रीच्या घटनांनी समाजासमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागानेही सक्रिय पावले उचलली असून, स्वतंत्र प्रतिबंधक कक्ष स्थापन करून महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथे वर्षा डहाळे या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मानवी तस्करी प्रतिबंधक कार्याला अधिक गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर 2002 साली Save the Children India (एसटीसीआय) च्या माध्यमातून “SOS – Save Our Sisters” (आपल्या बहिणींना वाचवा) ही महत्त्वपूर्ण चळवळ सुरू करण्यात आली होती. या चळवळीची सुरुवात विपुला कादरी यांच्या पुढाकारातून झाली. ग्रामीण भागातील महिला व मुलींच...
नांदेडमध्ये पुन्हा रक्तरंजित पहाट; युवा नेते सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या

नांदेडमध्ये पुन्हा रक्तरंजित पहाट; युवा नेते सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरात वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढत सोमवारी पहाटे आणखी एक खळबळजनक हत्याकांड घडले. श्रीनगर परिसरात युवा नेते सोनू कल्याणकर यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सलग हत्यांच्या मालिकेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडले होते. त्याच वेळी पंचशील कापड दुकानाजवळ अचानक एक चारचाकी वाहन थांबले. वाहनातून उतरलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारींसारख्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी शरीरावर सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी घट...
परभणी रेल्वे स्थानकावर तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी फरार

परभणी रेल्वे स्थानकावर तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी फरार

क्राइम
परभणी (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर आज (५ एप्रिल) सकाळी तोडफोड व मारहाणीची धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वरील लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक तोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करण्यात आली, तसेच देखभाल कर्मचाऱ्यावर हल्लाही करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने लिफ्टमध्ये घुसून दरवाज्याचा लॉक तोडत सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब ड्युटीवर असलेल्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने आक्रमक होत कर्मचाऱ्याशी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. परिस्थिती हाताळताना संबंधित कर्मचाऱ्याने आरोपीचा फोटो काढण्यात यश मिळवले आणि तत्काळ इतर कर्मचारी तसेच रेल्वे संरक्षण दल यांना माहिती दिली. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच आरोपी ...
नांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड

नांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना धावणारी वाहने, फटाका बुलेट, ट्रिपल सीट, मोबाईल वापरत वाहन चालविणारे तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फळगाड्यांवर कारवाई करत एकूण २४१ केसेस नोंदवण्यात आल्या. ही कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज गुरव आणि शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह ही मोहीम राबवली. रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या प्रमुख भागात वाहनांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. तसेच ऑटो- चालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून त...
चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| अवैध चंदन तस्करीविरोधात नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लातूरहून मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरकडे आयशर वाहनातून चंदनाची तस्करी होणार होती. त्यानुसार, लोहा-नांदेड मार्गावरील सई हॉटेलजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे दिसून आले, मात्र तपासात ड्रायव्हरच्या मागील बाजूस बनवलेल्या गुप्त कप्प्यात चंदन लपवून ठेवले असल्याचे उघड झाले. या कप्प्यातून 1,470 किलो वजनाचे सुमारे 36.75 लाख रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले. तसेच आयशर वाहन आणि 11 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 51.96 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी तुकाराम बुंदराळे, तौफिक देशमुख, रामदास बुंदराळे, बाळासाहेब जाधव आणि शंकर मानपा...
हिमायतनगरात टवाळखोरांचा हैदोस; कर्णकर्कश आवाज व फटाका बुलेटवर कारवाई कधी?

हिमायतनगरात टवाळखोरांचा हैदोस; कर्णकर्कश आवाज व फटाका बुलेटवर कारवाई कधी?

क्राइम
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात सध्या काही टवाळखोर तरुणांकडून बुलेट व इतर दुचाकींना अवैध बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण केला जात आहे. विशेषतः ‘फटाका बुलेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळामुळे शांततेचा भंग होत आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच निवासी भागांमध्ये मुद्दाम मोठा आवाज करत फेऱ्या मारल्या जात आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा हे वाहनचालक वेगमर्यादा मोडून स्टंटबाजी करत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. “पोलीस प्रशासनाने अशा वाहनांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, सायलेंसरमध्ये केलेले बदल जप्त करावेत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी नागरिकां...
कुंडलवाडीत धारदार तलवारीसह युवक जेरबंद; पोलिसांची तत्पर कारवाई

कुंडलवाडीत धारदार तलवारीसह युवक जेरबंद; पोलिसांची तत्पर कारवाई

क्राइम
नांदेड/बिलोली| कुंडलवाडी (जि. नांदेड) येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत कुंडलवाडी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत प्रतिबंधित धारदार तलवारीसह एका युवकाला जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी महालक्ष्मी मंदिर परिसरात एक संशयित इसम धारदार शस्त्रासह फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पंचांच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 31 इंच लांबीची लोखंडी तलवार, तिची म्यान आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या तलवारीची किंमत सुमारे 6 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अटक करण्यात आलेला आरोपी हर्ष उर्फ हर्षसिंग हाणमंत इंगळे (वय 19, रा. इंद...
नांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून; रुग्णालयातही रक्तरंजित सूडनाट्य

नांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून; रुग्णालयातही रक्तरंजित सूडनाट्य

क्राइम
नांदेड| शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केलं असून, शुक्रवारी मध्यरात्री तिहेरी खूनाची थरारक घटना घडली आहे. दोन प्रतिस्पर्धी गटांतील वर्चस्वाच्या वादातून सुरू झालेल्या हिंसक संघर्षात प्रथम दोघांचा निर्घृण खून झाला, तर काही तासांतच रुग्णालयात घडलेल्या सूडाच्या हल्ल्यात तिसऱ्याचा जीव गेला. या सलग घटनांमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कॅनाल रोड परिसरातील ई-स्क्वेअर सिनेमागृहाजवळ रात्री उशिरा दोन गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी धारदार शस्त्रांचा वापर करत जोरदार हल्ला करण्यात आला. या भीषण झटापटीत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथेच सूडाची आणखी एक थ...
error: Content is protected !!