Tag: ४.६० लाखांचे सामान परत

आरपीएफ नांदेडची सतर्क कारवाई; संशयितांना ताब्यात तर ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ४.६० लाखांचे सामान परत

आरपीएफ नांदेडची सतर्क कारवाई; संशयितांना ताब्यात तर ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ४.६० लाखांचे सामान परत

क्राइम
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तत्परता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत केली असून प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. पहिल्या घटनेत, रात्र गस्तीदरम्यान पूर्णा व परभणी येथील आरपीएफ तसेच जीआरपी पथकाने पोखरणी नरसिंहा रेल्वे स्थानकाजवळ गंगाखेड बाजूकडील होम सिग्नल परिसरात दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. मध्यरात्री सुमारे १२:३० वाजता हे दोघे संशयास्पद हालचाली करताना आढळले. चौकशीत त्यांनी आपली नावे राजू व छगन (दोघेही रा. परभणी) अशी सांगितली. संशयास्पद वर्तन लक्षात घेता पुढील कारवाईसाठी त्यांना जीआरपी परळी यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. दुसऱ्या घटनेत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफने प्रवाशांचे हरवलेले मौल्यवान...
error: Content is protected !!