Tag: ४ ठार

हडसणी फाट्यावर भीषण अपघात; ३ ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

हडसणी फाट्यावर भीषण अपघात; ३ ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र
संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील हडसणी फाटा येथे बुधवारी (22 एप्रिल) रात्री सुमारे 9 वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 केएन 2509 क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने हडसणी फाट्यावर दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. पहिल्या दुचाकीवरील रेखाबाई भाऊराव नरवाडे (42), त्यांचा मुलगा यशवंत नरवाडे (23) आणि नणंद अनुसया लोणाळे (43) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी भोकर येथील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,...
error: Content is protected !!