हु.ज.पा. महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती उत्साहात
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानासह शैक्षणिक कार्याचा गौरव
हिमायतनगर, प्रतिनिधी| हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे महानायक, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती हु.ज.पा. महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम.पी. गुंडाळे होते, तर इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वसंत कदम यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “स्वामी रामानंद तीर्थ यांची जन्मभूमी कर्नाटक असली, त...
