हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा
हनुमान जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वैभवाचे दर्शन घडवणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या पवित्र निमित्ताने बिलोली शहरात दरवर्षी आयोजित केली जाणारी कुस्त्यांची स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, ती शौर्य, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक बनली आहे.
बिलोलीतील कुस्त्यांची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी असून, या परंपरेने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मातीच्या आखाड्यात घडणारी ही कुस्ती केवळ शरीराची ताकद दाखवणारी नसून, ती मानसिक स्थैर्य, शिस्त आणि संस्कारांची जोपासना करणारी आहे. गावोगावी आणि जिल्ह्याजिल्ह्यातून येणारे कुस्तीपटू आपल्या कलेचा कस लावण्यासाठी येथे एकत्र येतात आणि त्यामुळे हा सोहळा एक भव्य क्रीडामहोत्सव ठरतो.
या परंपरेचा वारसा जपण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते....
