नांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल
नांदेड (प्रतिनिधी) समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुणांकडून धारदार शस्त्रांचे प्रदर्शन, गुंडगिरीचे व्हिडिओ व भितीदायक पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलाने कडक पावले उचलली आहेत. अशा आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, काही युवक सोशल मीडियावर तलवार, चाकू, कोयते, अग्नीशस्त्रे यांचे प्रदर्शन करत फोटो-व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तसेच चित्रपटातील गुंडगिरीचे गाणे वापरून रील्स तयार करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. काही प्रकरणांमध्ये मृत गुन्हेगारांचे गौरव करणारे व्हिडिओही प्रसारित होत असल्याचे आढळून आले आहे.
या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 मध्ये ...

