Tag: सोनू कल्याणकर खून

सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा उलगडा; मुख्य आरोपी जखमी, चौघे जेरबंद

सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा उलगडा; मुख्य आरोपी जखमी, चौघे जेरबंद

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहराला हादरवून सोडणाऱ्या सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा नांदेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी आकाश गंदमवार हा पोलिसांच्या कारवाईत जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश गंदमवार याचा पोलिसांनी पाठलाग केला असता त्याने स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या कारवाईत आकाश गंदमवार जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी उर्वरित तीन आरोपींनाही ताब्यात घेतले असून सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण कारवाईमुळे पोलिसा...
error: Content is protected !!