Tag: सोनू कल्याणकर

श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

क्राइम
नांदेड | नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या सहा तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. यावेळी मुख्य आरोपीवर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करत त्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे 5.20 वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर यांचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तात्काळ चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. मुख्य आरोपीवर गोळीबार मुख्य आरोपी अंकुश गजानन गंदनवाड (वय 20) हा झरी खदान परिसरात...
सोनू कल्याणकर हत्येनंतर संताप; आरोपींना कठोर शिक्षेची जोरदार मागणी

सोनू कल्याणकर हत्येनंतर संताप; आरोपींना कठोर शिक्षेची जोरदार मागणी

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरात घडलेल्या सोनू कल्याणकर यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट उसळली असून सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजलीसोबतच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. श्रीनगर परिसरात पहाटे झालेल्या या हल्ल्यात सोनू कल्याणकर यांचा मृत्यू झाल्यानंतर विविध समाज घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः लिंगायत समाजाकडून मोठ्या प्रमाणात भावनिक श्रद्धांजली पोस्ट शेअर केल्या जात असून “ही केवळ श्रद्धांजली नसून न्यायासाठीचा आवाज आहे” असा संदेश दिला जात आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेविरोधात एकजूट दाखवण्यासाठी नागरिकांना पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोनू कल्याणकर हे शिवा नरंगले यांचे भाचे असल्याने या प्रकरणाला सामाजिक व राजकीय स्तरावरही...
error: Content is protected !!