Tag: सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

शेती
कमी पावसाच्या शक्यतेमुळे पीक नियोजन, आंतरपीक आणि जलसंधारणावर भर देण्याचे आवाहन नांदेड | यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय मुख्य पिकांची पेरणी टाळावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करणे सुरक्षित ठरेल. अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसू शकतो. सोयाबीन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना वाढते उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. तसेच...
error: Content is protected !!