Tag: सामाजिक समता सप्ताह

सामाजिक समता सप्ताहांतर्गत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

सामाजिक समता सप्ताहांतर्गत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

सामाजिक
नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी ९ वाजता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देताना मान्यवरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजसुधारणेतील कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी विचार मांडले. यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक...
सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

करियर
नांदेड (प्रतिनिधी)  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कुलगुरूंनी सांगितले की, फुले-आंबेडकरांचे विचार केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. “हे विचार समाजातील बांधिलकीची जाणीव करून देतात आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. मात्र त्यांचा प्रभाव दिसण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या दृष्टिकोनात बदल घडवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, प्रमुख वक्ते डॉ. नारायण कांबळे, डॉ. रवी सरोदे, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. राजेंद्र गोणारकर तसेच...
error: Content is protected !!