सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – महात्मा बसवेश्वर
भारतात जे अनेक समाजसुधारक व धर्मसंस्थापक होऊन गेले त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशातील जाती व्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता इत्यादी वाईट प्रथा परंपरांवर अत्यंत मार्मिक भाषेत प्रहार करून श्रम प्रतिष्ठा व जाती धर्मातील भिंती पाडून सर्वांना एकत्रित आणून लिंगायत धर्माची स्थापना करणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा लेख.
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म २६ एप्रिल ११०५ रोजी तत्कालीन मंगळवेढा राज्य व सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील बागेवाडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादराज व आईचे नाव मादलांबिका होते. बसवेश्वर हे त्यांच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. बसवेश्वर यांना बसव, बसवण्णा असे ही संबोधले जाते. महात्मा बसवेश्वर हे त्यांच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळवण्याकरिता कृष्णा...
