Tag: सर्च अँड शूट

नांदेडमध्ये ‘सर्च अँड शूट’ ऑपरेशनची मागणी; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नांदेडमध्ये ‘सर्च अँड शूट’ ऑपरेशनची मागणी; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

क्राइम
नांदेड| शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची गरज व्यक्त करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते प्रकाश मारावार यांनी पोलिसांनी तात्काळ ‘सर्च अँड शूट’ ऑपरेशन राबवावे, अशी जोरदार मागणी केली आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात सध्या गोळीबार, हत्या, लुटमार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय रेती माफिया, सट्टा-जुगार, आयपीएल सट्टेबाजी, मटका, गुटखा यांसारख्या अवैध व्यवसायांचे जाळे वाढत असून त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे, असेही त्यांनी नमूद केले. मारावार यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले की, “राजकीय वरदहस्तामुळे काही ठिकाणी अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. एवढेच नव्हे तर दोन तालुक्यांतील नगराध्यक्षांवरही अवैध व्यवसायांमध्ये सहभागाचे आरोप आहेत. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सव...
error: Content is protected !!