Tag: संचालकाचा राजीनामा; संघटनेत खळबळ

राज्य मराठी पत्रकार परिषदेतून संचालकाचा राजीनामा; संघटनेत खळबळ

राज्य मराठी पत्रकार परिषदेतून संचालकाचा राजीनामा; संघटनेत खळबळ

महाराष्ट्र
नांदेड| राज्य मराठी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली असून, प्रा. डॉ. शिवदास हमंद यांनी आपल्या संचालक पदाचा तसेच मूळ सभासदत्वाचा राजीनामा सादर केला आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पत्रकार संघटनांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दि. १५ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय अध्यक्ष मा. मधुसूदन कुलथे यांना उद्देशून दिलेल्या पत्रामध्ये डॉ. हमंद यांनी आपल्या राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे. माध्यम क्षेत्रातील दैनंदिन कामकाज आणि विविध संघटनांमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “माध्यम क्षेत्रातील दैनंदिन कामे आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना ‘राज्य मराठी पत्रकार परिषद’ या संघटनेतील संचालक पद तसेच मूळ सभासदत्वाचा राजीनामा सादर करीत आहे,” असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्रासोबत त्यांनी संघटनेचे ओळखपत्रही परत केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या...
error: Content is protected !!