सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे रंगतदार समापन
आठ राज्यांसह रशियातील कलाकारांचा सहभाग; तृतीयपंथी सक्षमीकरण, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक वैविध्याचा अनोखा संगम
नांदेडमध्ये तीन दिवस रंगला भारतीय कला-संस्कृतीचा भव्य उत्सव
नांदेड, प्रतिनिधी| भारतीय संस्कृती, लोककला, सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि सर्वसमावेशक विकासाचा अनोखा संगम घडविणारा ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव–२०२६’ नांदेडच्या कुसुम सभागृहात १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड, विशेष सहाय्यक संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील नृत्य व संगीत स्पर्धा, लोककला सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, भव्य मोफत आरोग्य शिबिर, तृतीयपंथी सक्षमीकरण चर्चासत्र, रोजगार व स्वयंरोजगार उपक्रम, पुरस्का...
