आषाढी महोत्सवानिमित्त माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे श्री परमेश्वर मंदिरात दर्शन
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात आषाढी एकादशी व आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढीच्या पार्श्वभूमीवर हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी मंदिरातील धार्मिक परंपरा व आषाढी महोत्सवाच्या नगरप्रदक्षिणा दिंडी व इतर आयोजनाबाबत श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी चर्चा केली. श्री परमेश्वर मंदिराला भेट देत त्यांनी भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, सुभाष शिंदे, पाळजकर काका, राजू जयस्वाल, ज्ञानेश्वर शिंदे, पवन गुंडेवार, आनंद मुतनेप...
