शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी
१५ जुलैपासून राज्यभर मोहिमेला प्रारंभ; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेड | सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज भासणार नाही. गेल्या काही वर्षांत ई-पीक पाहणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदापासून पीक पाहणीची जबाबदारी थेट शासन नियुक्त सहाय्यकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे.
ई-पीक पाहणी ही शासकीय योजना, पीक कर्ज, पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पिकांची अचूक नोंद असल्यास शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते.
नवीन निर्णयानुसार तहसीलदारांमार्फत नियुक्त करण्यात आलेले विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी...
