पोटा येथे शासन दरात खत वितरण; शेतकरी हिताच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे पोटा नगरी येथील सत्यसाई कृषी सेवा केंद्रात शासन दरानुसार खत वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी भेट देऊन खत वितरणाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागोरावजी शेंडगे (बापू), काँग्रेसचे आनंदराव ढवळे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर युवा तालुकाध्यक्ष परशुराम पाटील जाधव उपस्थित होते. त्यांनी शासन दरात आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत असलेल्या खत वितरण उपक्रमाचे स्वागत करत शेतकरी हिताच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी कैलास माने पाटील यांचे जावई तथा सत्यसाई कृषी सेवा केंद्राचे संचालक शुभम ढुरे पाटील यांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना शासन दरानुसार खताचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ...
