Tag: शिवाजी महाराज पुतळा

हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेसाठी आंदोलन तीव्र; ‘गाव बंद’चा इशारा..!

हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेसाठी आंदोलन तीव्र; ‘गाव बंद’चा इशारा..!

महाराष्ट्र
हिमायतनगर अनिल मादसवार | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी नगरपंचायत समोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिकच तीव्र झाले असून, शहरातील वातावरण तापू लागले आहे. उपोषणकर्ते माधव शिंदे यांनी “जागा मिळेपर्यंत माघार नाही” असा निर्धार व्यक्त केला असून, आंदोलनस्थळी जमलेल्या समर्थकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर सर्व समाजाला सोबत घेऊन गाव बंद आंदोलन छेडण्यात येईल. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही जागांपैकी एकही जागा देऊ शकत नसल्याचे पत्र दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे उपोषणकर्त्यांची एकप्रकारे अवहेलना झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाच्या काही अधिकाऱ्याने भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी उपोषणकर्त्याने जोपर्यंत जाग...
error: Content is protected !!