शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपप्रमुखपदी मसूद पठाण यांची नियुक्ती
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील रहिवासी मसूद खान रऊफ खान पठाण यांची शिवसेना अल्पसंख्याक विभाग, नांदेडच्या जिल्हा उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख अन्वर अहमद यांनी प्रदान केले.
या नियुक्तीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार सईद भैया खान यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्याची भावना मसूद पठाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल हिमायतनगर परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच...
