‘मला माफ करा…’ शिक्षकाच्या स्टेटसने उलगडला शोकांतिकेपूर्वीचा संघर्ष!
दोन चिमुकल्यांसह शिक्षकाची आत्महत्या; शिक्षण विभागातील कथित मानसिक छळाच्या आरोपांनी खळबळ
नांदेड/भोकर/हदगांव/हिमायतनगर, प्रतिनिधी| ‘मित्रांनो, मला माफ करा...’ या शब्दांनी सुरू झालेल्या सोशल मीडिया स्टेटसने एका शिक्षकाच्या कुटुंबाच्या शोकांतिकेपूर्वीचा कथित संघर्ष समोर आणला आहे. हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन लहान मुलांसह आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात कार घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शिक्षण विभागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिक्षक सुनील मोरे आणि त्यांच्या पत्नी दोघेही एकाच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. घटनेपूर्वी मोरे यांनी सोशल मीडिया स्टेटसमध्ये शिक्षण विभागातील काही अधिकारी व २०२३ ते २०२५ या कालावधीतील विविध चौकशा, तक्रारी आणि कथित मानसिक त्रासाचा उल्लेख...
