शहापूरच्या ‘आपला गणेश मंडळा’ला तृतीय पारितोषिक
डीजे, नशा, गुलाल आणि जुगारमुक्त गणेशोत्सव; सामाजिक जनजागृतीसह उत्कृष्ट शिस्तीची दखल
शहापूर, प्रतिनिधी| गणेशोत्सवात उत्कृष्ट देखावे, स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जनजागृतीसह शांततेत उत्सव साजरा केल्याबद्दल शहापूर येथील आपला गणेश मंडळाला देगलूर पोलिसांच्या वतीने तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. देगलूर तालुक्यातील सुमारे ३०० गणेश मंडळांमधून आपला गणेश मंडळाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
देगलूर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळगट यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
आपला गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त, नशामुक्त, गुलालमुक्त आणि जुगारमुक्त वातावरण ठेवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार उत्सव काळात उत्तम शिस्त व स्वच्छता राखत आकर्षक देखावे सादर करण्यात आले....
