पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर
नांदेड| राजकारणात बदल हा शाश्वत असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तब्बल पाच विधानसभा निवडणुकांत शिवसेनेविरुद्ध लढत देणारे ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. २९ मार्च रोजी लोहा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत.
नव्वदच्या दशकात “भीक नको, हवे घामाचे दाम” या घोषणेने राज्यभर आंदोलने उभारणारे शंकरअण्णा धोंडगे हे शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या विचारातून घडलेले नेते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघर्ष करत अनेकदा जेलही भोगली. प्रभावी वक्तृत्व आणि शेतकऱ्यांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी मोठा कार्यकर्ता वर्ग तयार केला.
१९९५ पासून कंधार विधानसभा मतदारसंघात त्यांनी अपक्ष आणि नंतर विविध पक्षांतून निवडणुका लढवत शिवसेनेशी थेट मुकाबला केला. त्या क...
