नांदेड–तीरुचानुर विशेष रेल्वेची सेवा सप्टेंबरमध्येही सुरू; ५ फेऱ्यांचा प्रवाशांना लाभ
अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय; मंगळवारी नांदेडहून तर बुधवारी तीरुचानुरहून सुटणार
नांदेड | नांदेड आणि तिरुपतीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 07603/07604 नांदेड–तीरुचानुर–नांदेड विशेष रेल्वेगाडीची सेवा सप्टेंबर २०२६ मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची संरचना कायम ठेवून ही विशेष रेल्वे धावणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07603 नांदेड–तीरुचानुर विशेष सप्टेंबर महिन्यात प्रत्येक मंगळवारी धावणार आहे. या गाडीच्या १, ८, १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी एकूण पाच फेऱ्या होणार आहेत. तर गाडी क्रमांक 07604 तीरुचानुर–नांदेड विशेष प्रत्येक बुधवारी धावणार असून, २, ९, १६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी एकूण पाच फेऱ्या करण्यात येणार आ...
