धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड (प्रतिनिधी) धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर यांनी अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर तसेच धर्माबाद आणि बिलोली येथील मराठवाडा जनहित पक्षाविरोधात सीबीआय कार्यालयासमोरून केलेल्या कथित आरोपांमुळे बिलोली शहर व तालुक्यात मोठे पडसाद उमटले आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता बिलोली येथे संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
या संदर्भात बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत बेळकोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आरोपांमुळे सार्वजनिक जीवनात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, सुरेंद्र बेळकोणीकर यांनी नेमके कोणते आरोप केले, त्यामागील तथ्य काय आहे, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर प्रसारि...
