Tag: विकासकामे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

धर्म अध्यात्म
नाशिक| पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्यासह विविध संत-महंत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभ मेळा (Kumbh Mela) हा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा असून, भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत ...
error: Content is protected !!