नांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना धावणारी वाहने, फटाका बुलेट, ट्रिपल सीट, मोबाईल वापरत वाहन चालविणारे तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फळगाड्यांवर कारवाई करत एकूण २४१ केसेस नोंदवण्यात आल्या.
ही कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज गुरव आणि शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह ही मोहीम राबवली.
रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या प्रमुख भागात वाहनांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. तसेच ऑटो- चालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून त...
