वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; अशोकराव कासराळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
हिमायतनगर, प्रतिनिधी| वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी करण्याचा आदर्श उपक्रम हिमायतनगर येथे राबविण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था, नांदेडचे चेअरमन तथा गोल्ला-गोलेवार यादव महासंघ, नांदेडचे जिल्हा सचिव मा. अशोकराव कासराळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांना वही, पेन व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गोल्ला-गोलेवार यादव महासंघ, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवक अभिषेकजी बकेवाड यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी गोल्ला-गोलेवार यादव महासंघाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड सिरंजनीकर, शहराध्यक्ष श्याम सेठ जक्कलवाड, सहकोषाध्यक्ष संजय बलपेलवाड तसेच ...
