तापत्या उन्हातही रंगांची उधळण… लिंबगाव रस्त्यालगत बहरलेला गुलमोहर !
नांदेड| शहरालगतच्या लिंबगाव रस्त्याच्या कडेला दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलमोहराने आपला लालभडक साज चढवला आहे. उन्हाच्या तीव्र झळा, रखरखते रस्ते आणि कोरडी धरती… अशा वातावरणातही हा वृक्ष जणू निसर्गाचा उत्सवच साजरा करताना दिसतो.
गुलमोहराचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत त्याचा होणारा बहर. मार्च ते जून या कालावधीत पानांपेक्षा फुलांनी भरलेला हा वृक्ष निसर्गप्रेमींना आणि छायाचित्रकारांना नेहमीच आकर्षित करतो. लाल, केशरी आणि पिवळ्या छटांचा हा फुलांचा वर्षाव जणू आकाशाशी संवाद साधत असतो.
ऋतू बदलतात…
दरवर्षी तेच उन्हाळे, तेच रस्ते, तेच वृक्ष…
पण प्रत्येक ऋतूत निसर्ग काहीतरी नवीन सांगत असतो. तो बदल शोधण्याचा प्रयत्न माझा कॅमेरा सातत्याने करत असतो. सारखेपणातला वेगळेपणा, कोरडेपणातली रंगांची चाहूल आणि शांततेतली जीवनाची धडपड — हे सारे माझा कॅमेरा टिपत राहतो.
गुलमोहराचा हा बहर म्हणजे केवळ ...
