Tag: लातूर

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

क्राइम, महाराष्ट्र
नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहि...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाई : नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांच...
नांदेड परिसरात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिसरात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दि. 16 ते 31 मार्चदरम्यान पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने 30 मार्च रोजी उदगीर–अहमदपूर रोडवर संशयित बोलेरो वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध गुटखा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई सुरू आहे. गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यांसारख...
error: Content is protected !!