लोह्यात भव्य शेतकरी मेळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
नांदेड/लोहा | नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकरी व महिला कल्याणाच्या विविध योजनांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडत मोठ्या घोषणा केल्या. या मेळाव्याला जिल्ह्यासह आसपासच्या भागातून शेतकरी, महिला व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आमदार व ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. या वेळी त्यांचा “महाराष्ट्राचे शेतकरी नेते” असा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. विशेषतः “लाडकी बहिण” योजनेचा उल्लेख करत ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे त्यांनी ठ...
