एका दिवसात 500 विनातिकीट प्रवासी पकडले
नांदेड, अनिल मादसवार | प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने 26 मार्च 2026 रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवली. सकाळी 6 ते सायंकाळी 8 या कालावधीत झालेल्या या कारवाईत तब्बल 500 अनधिकृत प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली असून एकूण ₹3,42,580 इतकी वसुली करण्यात आली.
या विशेष मोहिमेवर सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांनी देखरेख ठेवली. 28 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 25 गाड्यांमध्ये सखोल तपासणी केली.
तपासणीदरम्यान 449 विनातिकीट प्रवाशांकडून ₹2,14,410 भाडे आणि ₹1,15,190 दंड वसूल करण्यात आला. तसेच 15 अनियमित प्रवास प्रकरणांतून ₹3,730 भाडे व ₹3,750 दंड वसूल झाला. याशिवाय 36 अनबुक्ड सामान प्रकरणांतून ₹5,500 रक्कम वसूल करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि सोबतचे सामान नियमां...
