हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात संपन्न; रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद
नांदेड,गोविंद मुंडकर | भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरात 'हर घर तिरंगा २०२६' अभियान अत्यंत उत्साहात सुरू आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून दि.१३.०८.२०२६ रोजी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक भव्य आणि अभूतपूर्व *'तिरंगा बाईक रॅली'* काढण्यात आली. शेकडो दुचाकीस्वार, हातात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणा अशा अत्यंत भारावून टाकणाऱ्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली. या रॅलीने आज संपूर्ण नांदेड शहराला देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले.
या अभूतपूर्व तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात नविन नांदेड भागातील हडको बस स्टॉप पासुन करण्यात आली. हडको चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केल्यानंतर तिरंगा कॅनव्हसवर स्वाक्षरी करुन *महापौर सौ...
