हिमायतनगरातील रुक्मिणीनगर येथे श्री सिद्ध हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
१४ मे रोजी होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन
हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील रुक्मिणीनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्ध हनुमान मंदिर येथे भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
मंदिर परिसरात सकाळी ६ ते ९ या वेळेत महोत्सव होम-हवन विधी पार पडणार असून, या धार्मिक विधीचे मार्गदर्शन श्री गजानन वाळके गुरु करणार आहेत. तसेच सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी रुक्मिणीनगर परिसरातील नागरिक, माता-भगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचि जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर तर सचिव प्रा. कागणे व सह मंदिर...
