Tag: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

सरसम–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सरसम–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

क्राइम
हिमायतनगर | सरसम ते हिमायतनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर नामेवार व लक्षटवार हे सरसम येथून हदगाव तालुक्यातील वाळकी व तामसा गावाकडे मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी समोरून वाळकेवाडी येथील क्षीरसागर लक्ष्मणराव हे ऑटो घेऊन येत असताना रस्त्यावरील भेगांमध्ये दुचाकी अडकल्याने मोटारसायकल घसरली व थेट ऑटोला जाऊन धडकली. या भीषण अपघातात गंगाधर नामेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोचालक क्षीरसागर लक्ष्मणराव व दुचाकीवरील लक्षटवार हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सरसम येथील नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमींना प्र...
error: Content is protected !!