Tag: राजा भगीरथ विद्यालयात

राजा भगीरथ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

राजा भगीरथ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर उत्तरवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधीर उत्तरवार सर होते, तर ज्येष्ठ शिक्षक पतलेवाड सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्...
error: Content is protected !!