रमेश गाडगे यांचा गुरू गौरव पुरस्काराने सन्मान
शहापूरवासीयांसाठी अभिमानाचा क्षण; शिक्षक दिनानिमित्त उल्लेखनीय कार्याची दखल
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर, ता. देगलूर येथील रहिवासी तथा मडगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक रमेश गाडगे यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘गुरू गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या रमेश गाडगे यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देगलूर येथील गोविंद जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, गटशिक्षणाधिकारी बालाजी घोडाजी, माधव डाकोरे, ढगे, म्याकलवार, मुख्याध्यापक आमटे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द...
