Tag: रक्तरंजित पहाट

नांदेडमध्ये पुन्हा रक्तरंजित पहाट; युवा नेते सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या

नांदेडमध्ये पुन्हा रक्तरंजित पहाट; युवा नेते सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरात वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढत सोमवारी पहाटे आणखी एक खळबळजनक हत्याकांड घडले. श्रीनगर परिसरात युवा नेते सोनू कल्याणकर यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सलग हत्यांच्या मालिकेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडले होते. त्याच वेळी पंचशील कापड दुकानाजवळ अचानक एक चारचाकी वाहन थांबले. वाहनातून उतरलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारींसारख्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी शरीरावर सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी घट...
error: Content is protected !!