हिमायतनगरला किनवट नव्हे, नांदेडच सोयीस्कर! — जेष्ठ पत्रकार असद मौलाना यांचे हरकतींसाठी जनतेला आवाहन
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील दुर्गम भागाच्या प्रशासकीय सोयीसाठी किनवट येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि इस्लापूर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असला, तरी हिमायतनगर तालुक्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव कितपत लाभदायक ठरणार, यावरून चर्चा रंगू लागली आहे.
विशेषतः हिमायतनगर तालुका व शहरातील नागरिकांसाठी नांदेड हे प्रशासकीयदृष्ट्या अधिक सोयीस्कर असल्याचे मत व्यक्त होत असून, या प्रस्तावावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार असद मौलाना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
प्रशासनाने किनवट येथे नव्याने प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हिमायतनगर, हदगाव, माहूर, भोकर यांसह इतर तालुक्यांचा समावेश करण्याचा प्राथमिक प्रस्ताव जाहीर केला आहे. यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण...
