Tag: मौखिक आरोग्य

20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

आरोग्य
नांदेड (गोविंद मुंडकर) दि. 20 मार्च ते 20 एप्रिल 2026 हा कालावधी ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’ म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे.नागरिकांमध्ये दंत व मौखिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, नागरिक आणि विशेषतः वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, बालगृहे आणि ग्रामीण भागात मोफत तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि आरोग्य मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 02 एप्रिल 2026 रोजी नांदेड येथील सुमन बालगृहात मौखिक आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नि. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम बुट्टे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राष्ट्रपाल औसारे तसेच दं...
error: Content is protected !!