मुलींकडून शुल्क वसुली प्रकरण; शासनाच्या घोषणेनंतरही महाविद्यालयांचा मनमानी कारभार उघड
नांदेड (प्रतिनिधी) राज्य शासनाने मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला असूनही नांदेड जिल्ह्यातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थिनींकडून शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट इशारा देत अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.
शासनाने दोन वर्षांपूर्वी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय अमलात आणला. या अंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची भरपाई शासनाकडून महाविद्यालयांना दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थिनींकडून शुल्क आकारणी सुरूच ठेवली असल्याची बाब उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे, काही महाविद्यालयांनी “शासनाकडून पैसे आल्यानंतर विद्यार्थिनींना परत करू” असे सांगून सलग दोन वर्षे रक्कम वसूल केली. परंतु शासनाची रक्कम मिळूनही संबंधित ...
