Tag: माकप आक्रमक आयुक्तांना निवेदन

गोलचाळ परिसरातील पाणीप्रश्नावर माकप आक्रमक आयुक्तांना निवेदन; मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा

गोलचाळ परिसरातील पाणीप्रश्नावर माकप आक्रमक आयुक्तांना निवेदन; मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा

सामाजिक
नांदेड| शहरातील खडकपुरा भागातील गोलचाळ परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, माकपच्या गोलचाळ शाखेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांना सोमवारी (दि. ११ मे) निवेदन देण्यात आले. गोलचाळ परिसरात मोठ्या प्रमाणात मील मजदूर, बीडी कामगार तसेच रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. पूर्वी पहाटे ३ वाजता नळाला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वेळेत बदल करून सकाळी उशिरा पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गोलचाळ शाखेचे सचिव मंगेश वट्टेवाड यांनी आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात पूर्वीप्रमाणे पहाटे ३ वाजता पाणीपुरवठा सुरू करावा, उच्च दाबाने पाणी द्यावे तसेच अने...
error: Content is protected !!