चार टोल नाके बंद करण्याची मागणी; २० वर्षांच्या टोल वसुलीची चौकशी करा – महेंद्र गायकवाड
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील नायगाव (कहाळा), मुखेड, बिलोली (दगडापूर) आणि देगलूर तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या टोल नाक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र) नांदेडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे चारही टोल नाके तात्काळ बंद करून गेल्या २० वर्षांतील टोल वसुली व कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महेंद्र गायकवाड यांनी आरोप केला आहे की, संबंधित टोल नाक्यांवर गेल्या दोन दशकांपासून वाहनचालकांकडून कोट्यवधी रुपयांची टोल वसुली करण्यात आली, मात्र रस्त्यांची स्थिती आजही समाधानकारक झालेली नाही. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, निकृष्ट डांबरीकरण, रस्त्यांच्या कडेला...
