महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन
नांदेड| जागतिक लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक व क्रांतीयोगी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने कौठा येथील त्यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज (दि. १९ एप्रिल) सकाळी १० वाजता महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमहापौर दिपकसिंग रावत तसेच सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनीही महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ, कवी आणि लिंगायत संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांनी सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा पाया रचत जातिव्यवस्थेविरोधात लढा दिला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.
या कार्यक्रमाला खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, भाजपा ...
