Tag: मंत्री उदय सामंत

शासनाच्या कार्यालयात मराठीची विटंबना खपवून घेणार नाही; दोषींवर विभागीय चौकशी होणार : मंत्री उदय सामंत

शासनाच्या कार्यालयात मराठीची विटंबना खपवून घेणार नाही; दोषींवर विभागीय चौकशी होणार : मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र
नांदेडमध्ये स्पष्ट आश्वासन; राज्यातील पहिली शुद्धलेखन कार्यशाळा नांदेडमधून सुरू करण्याची घोषणा नांदेड | महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेची शासनाच्या कार्यालयांमध्ये होणारी विटंबना कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. संबंधित प्रकरणातील उपविभागीय अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथे दिले. बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) नांदेडमध्ये साहित्यिक, पत्रकार आणि विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी मराठी भाषेच्या वापराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची गंभीर दखल घेतली. "मी केवळ राजकीय प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राचा मराठी भाषा मंत्री म्हणून बोलत आहे. शासनाच्या कार्यालयात मराठी भाषेचा अवमान किंवा विटंबना होणे अजिबात स्वीकारले जाणार नाह...
error: Content is protected !!